खंत उरी सलते...
खंत उरी सलते...
क्षण क्षण काहूर मनात जागते
कण कण वेदना मनी सलते
वेळी अवेळी खंत उरी बोलते
मन असे हे कोणासाठी झुरते ...
आशांत लाटा या सागर डोही
मनाचा या ताबा क्षणात घेई
कौल जगण्याचा का अंत पाही
मरण सुखाचा विश्वास का देई
वेळी अवेळी खंत उरी बोलते
शब्दांना भाव कळुनी ना कळते
क्षणात जिंदगीही गैर का वाटते
दर्पणात जागण्याचे मर्म शोधते
सांजेस दिसाचा विरह खलतो
क्षितिजास क्षणाचा विसर पडतो
गंधाळते रात्र बेभान होऊनही
स्वप्नास जागण्याची आस देते..
वेळी अवेळी खंत उरी सलते
भासात कोणाचे श्वास शोधते
चल बिचल अंतरी या गुंजते
खुणा कोणत्या त्या उरी जपते...
नकोच वाटे सल अंतरिम ती ही
छळ उगा भावनेचा कल्लोळ ही
विरक्तीत आभास हा जगण्याचाही
छंद मनाचा भासतो आगळा ही...

