STORYMIRROR

Suhas Bokare

Romance Tragedy

3  

Suhas Bokare

Romance Tragedy

मनोदशेत तू

मनोदशेत तू

1 min
272

तो ताण राख-माती मारेकरी मनाचा

ताणात घेतला तू ताबा तरी मनाचा


नोंदीत आज होतो पत्ते जुने पुराणे 

तूझ्या घरी नको हा त्रागा परी मनाचा


रातीस तूच यावी साशंक आस नाही 

जागा समीर झाला ह्याच्या वरी मनाचा


माजून गुंजतोया वारा मनात ला हा 

तूझाच भास का गं कोना धरी मनाचा


ओट्यास सिंचले ओले ओल ती विषारी 

रक्तात चिंब ओला ओटा जरी मनाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance