STORYMIRROR

Sharad Waghmare

Tragedy

3  

Sharad Waghmare

Tragedy

कोरोना ने व्याखूरले आयुष्य

कोरोना ने व्याखूरले आयुष्य

1 min
227

किती कठोर आहेस रे कोरोना आता तरी लाज धर 

तुझ्यामुळे हातावरच्या पोटांना मिळेना रे भाकर 


घे समजून आता तरी फिरवून घे रे पाठ

माझ्या उपाशी लेकरांना मिळूदे जेवणाचं ताट 


तुझ्यामुळे आलेला आता एकांत नकोसा झालाय 

माझ्याच पोटचा गोळा 


माझ्या कुशीत येईना झालाय 

का पाहतोस असा अंत उभी करून नात्यात भिंत 


एवढा कठोर झालास तू 

तुला वाटेना का रे खंत 

का असा भडकलयास तू 


काय केला आम्ही कसूर 

तुझ्यामुळे देशात माझ्या 

उपाशी मरतोय रे मजूर 


एकदा माझ्या देशातल्या गरीबाचा विचार कर 

जा रे जा कोरोना परतीची वाट धर परतीची वाट धर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy