आठवण
आठवण
कधी मी आठवण काढत नाही
कधी तू आठवण काढत नाही
तरीही आपल्या जुळलेल्या नात्याला
काहीच फरक पडत नाही
तू मात्र मनात जागा करून बसलीस
रडता रडता हळूच माझ्याकडे बघून हसलीस
तू नाही बोललीस की एकटं एकटं वाटतं ग
विसरणार तर नाही या भीतीच सावट मनात दाटतं ग
प्रेम मी केलंय शेवटपर्यंत निभावनार
आयुष्यात कुठल्याच वळणात तुला कधीच नाही रडवनार
आता तरी कूठे मी आनंदी झालोय ग
तूझ्या साठीच कदचित जन्माला आलोय ग
