सातवीतलं प्रेम
सातवीतलं प्रेम
आठवतयं मला मी रोज चुक करायचो
आणि शिक्षा म्हणून नेहमी तुझ्यासाठी गाण गायचो
तुला ना पहिलं कधी तर वेडाच व्हायचो
मग असचं कुठेतरी कोपऱ्यात बसून खुप काही लिहायचो
वर्गामधल्या खिडकीमधे मीच रोज बसायचो
अनं माझ्याच मित्रांच्या पाठीमागून चोरून तुला बघायचो
तूजेच हसणे आणि मग रूसणे हेच सगळं पहायच
आणि पाहता पाहता पानांवर हेच तर लिहायच
एकटक पाहणं तुझ्याकड कधी जमलंच नाही
कारण पाहील की वाटायचं बोलाव सगळं काही
खरच डोळ्यात तुझ्या पाहून मी स्वतःशीच हसायचो
कारण तुझ्यासाठी वेडा झालेलो मीच मला दिसायचो
नाही कधीच वाटलं की सोडून मला तू जावं
वाटायचं सातवीत केलेल प्रेम मरेपर्यंत रहावं
आता सोडून जाता जाता शेवटी काहीतरी म्हणायचं
वाईट वेगळं काही झाल तरी प्रेम ऐकिवरच करायचं ऐकिवरच करायचं ....
चल जाता जाता सांगुन गेली कस कोनाशी रहायचं
आयुष्यभर जरी दुखः आसल तरी फक्त गोड हसायचं
