STORYMIRROR

Krishna Sonpethkar

Tragedy

3  

Krishna Sonpethkar

Tragedy

काळोखलेली पोर्णिमा

काळोखलेली पोर्णिमा

1 min
159

ढगाआड का लपला रे?

चांदण्यांच्या राजा तू

एकटी मी वाट पाहते

क्षितिजाच्या टोकाला रे....


का रे अंधारीलीस तु?

पोर्णिमेची शुभ्र रजनी

कुणी माझे ऐकेना रे

काहूर पेटलेले मनी...


आठवणींचे वादळ उठले

श्वास माझा गुदमरला रे ...

डोळे माझे आतुरले 

कंठ माझा तहानला रे...


दिवस माझा अंधारलेला

रात्रही तू अंधारलेली रे....

जीवन हे काळोखले ;आणि

तुझा खेळ चालला रे....


असा खेळ खेळू नकोस

मुख तुझे दाखवणा रे....

तुझा या खेळापायी

जिव माझा जाईल ना रे....


ढगाआड का लपला रे?

चांदण्यांच्या राजा तू

एकटी मी वाट पाहते

क्षितिजाच्या टोकाला रे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy