STORYMIRROR

Krishna Sonpethkar

Tragedy

3  

Krishna Sonpethkar

Tragedy

सूर माझा एकटा

सूर माझा एकटा

1 min
211

जीवनाचे मूर्त गाणे

गात आहे मी एकटा,

तुझी सोबत असतानाही

सूर माझा एकटा...


जीवनातील तरंगांमधला

मी तरंग; जो ना कुणा दिसला,

तरंगाला या किनारा लाभण्या

सांग काय मी करू आता?


गाण्यातील सप्तसूरांतला

मी सूर; जो दुर्लक्षिलेला,

ओठांत तुझीया आवाज माझा येण्या

सांग काय मी करू आता?


या भरल्या आकाशातला

मी पक्षी; जो आहे नेणता,

घरट्याचं एक स्वप्न पहावया

सांग काय मी करू आता?


जीवनाचे मूर्त गाणे

गात आहे मी एकटा,

तुझी सोबत असतानाही

सूर माझा एकटा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy