दु:ख
दु:ख
कुणाकुणाच्या जीवनात नाही दुःख ?
कुणाकुणाच्या जीवनात नाही सुख ?
हिंडलो वणवण त्या सुखासाठी
तरी येते दु:ख माझ्या पाठी,
नाही क्षणाचाही विसावा
मला न मिळाले कधी सुख,
जीवनभर फक्त झेलले दु:ख,
का प्रत्येक सुखात माझ्या..
देत असते दखल दु:ख ?
जीवनात करायचे काही खास
हाच मनी धरुनी ध्यास..
गेलो मी सोडून घरास,
तिथेही मज स्वार्थापायी..दिलेले सर्वांनी दु:ख
काही माणसांच्या जिवनात
नसतेच का हो चांदणे ?
जीवनभर त्यांनाच का, लागते उन्हात चालणे ?
दु:खात सुख मानुनि
निराशेत आशा पाहुनी
केलेत खूप प्रयत्न,चुका माझ्या सुधाराया
तरीही नाही दुःखाने..
मला त्यागीले सुखाने,
तरीही नव्या आत्मविश्वासाने..
पुन्हा चाललो रस्त्याने,
मिळेल कुठेतरी उन्हात या
थंड सावली रस्त्याने.
