STORYMIRROR

Anu Dessai

Romance Tragedy Others

3  

Anu Dessai

Romance Tragedy Others

छोट्याश्या पत्रास...

छोट्याश्या पत्रास...

1 min
324

मेघधारा कोसळता

ओलेचिंब झाले केस

सख्या होऊन बेभान

ओलांडावी वाटे वेस


अबोल्याचा मुका मार

काय सांगू वेदनेस

कोणी लाविले ग्रहण

तुझ्या प्रेम भावनेस


गर्दीमध्ये विचारांच्या

पावसाची ही आरास

रडवेले होई मन

साद घालते स्वरास


मुक्त करेन म्हणते

आता घावांच्या सत्रास

दिरंगाई होते जशी

तुझ्या छोट्याश्या पत्रास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance