आभासी या मनाने
आभासी या मनाने
आभासी या मनाने
जोडले नाते प्रेमाचे
स्वप्नात न पाहिलेले
बंध जोडले नात्याचे.
जिवनाच्या या वाटेवर
आभासी मनाचा भास
पडले मी प्रेमात त्याच्या
जरी भेटला नव्हता खास.
नव्हते वास्तवाचे भान
फक्त भावनेच्या प्रतिमेला
हृदयात जपले मी साजणा
फसले आभासी दुनियेला.
आभासी या मनाने केला
खेळ माझ्या आयुष्याचा
गुन्हा मीच केला होता तो
दोष तो माझ्याच मनाचा.
आभास प्रत्येकाला वाटतो
खराखुराच तो असावा
पण प्रत्यक्ष जीवनात मात्र
तो मुळी कधी खरा नसावा.
