प्रेम : माणूस आणि व्यसनाचे
प्रेम : माणूस आणि व्यसनाचे
जीवनभर त्याने तिच्यावर जिवापाड प्रेम केलं,
असं समजून की,तिचही त्याच्यावर तेवढच प्रेम असेल
पण तिचं त्याच्यापेक्षा त्याच्या शरीरावर जास्त प्रेम होतं
घ्यायचा घोट मोठ्या प्रेमाने तो,
तिच्या ‘मादक’ रसाचा
तीही धुंद करायची त्याला,दुंनियेचा विसर पडायचा
विचार फक्त तिचे आणि त्याचे
तिच्यासाठी त्याने घरदार,पोरेबाळे यांच्यावर ठेवले तुळशीपत्र
आईवडिलांना लावली भीक मागायला
तिच्यासाठी आणि फक्त तिच्यासाठीच
तिनेही त्याच्या शरीराला पुर्णपणे व्यापून टाकले
त्याच्या नसानसात ती आणी फक्त तीच भिनली
तिच्यावाचून त्याला जराही चैन मिळेना
तिच्या आणि त्याच्या प्रेमाची,आता चेष्टेची बाब झाली,
कारण तिचे प्रेम त्याच्यासाठी,घातक ठरू लागले होते,
ती त्याला आतून जाळत असल्याचं त्यालाही जाणवत होतं
तरीही त्याचं तिच्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही,
याउलट आणखीच वाढलं
वाडवडिलांची संपत्ति आणि ईज्जत
त्याने तिच्यासाठी धुळीत मिळवली,अगदी निर्दयपणे !
अखेर तीनेही त्याला तसाच प्रतिसाद दिला...
व त्यालाही मातीत मिळवलं
असाच होतो शेवट प्रेमाचा,व्यसन आणि माणसातील ...
हे कुठतरी थांबायला हवं,व हे तिच्या प्रियकरांनाच समजायला हवं
नाहीतर प्रेमाचा शेवट दु:खातच होईल यात शंका नाही.
