बाग...
बाग...
पाहता बाग ही बहरलेली
फुलुनी आल्या कळ्या गुलाबाच्या
फांदीवरती हा बहर जणू जीवनाचा
फुलुनी हसल्या सार्या या अंगणात
उगवली पहाट आज नव्या स्वप्नांची
संगत हवी होती मनास प्रसन्नचीत्ती
भेटली होती आज बाग होउनीती
बहरल्या एकाच वेळी अनेक कळ्या
हसरया चन्द्राच्या त्या होत्या कला
घाव असा का घातला नियतीनेही
पांगुन गेल्या त्या भयावह ज्वालाने
फुलली होती बाग सारी फुलानी
घात झाला जाळली ती बाग कुणी
बेचिराख झाली होती एक बाग ती
स्वप्न होत कुण्या उदरी ते जपलेल
पाहता बाग ही बहरलेली गुलाबकळी
पापणी होते ओली आसवे येती गाली
