STORYMIRROR

Kalpana Deshmukh

Tragedy

3  

Kalpana Deshmukh

Tragedy

मनातील भावतरंग

मनातील भावतरंग

1 min
228

 मन चंचलतेचे रूप

 उधाण वाऱ्यासम भरकटते

 ते फुलपाखरू होऊन

 स्वच्छंदीपणे भिरभिरते ।।


 मन भावनिक गुंतागुंत

 असंख्य भावतरंगी लाटा

 मन कल्पनांचे भांडार

 जीवनातील स्वप्नमय वाटा ।।


मनात खोल विचारांची घुसमट

जणू उधाणलेला सागर

मनातील मळभ दूर करूनी

करा,नितळ सुंदर निर्झर ।।


 मन, उधाणलेला वारा

 दुःख अन् नैराश्येचा भारा

 गहन प्रश्नांचा होई उद्रेक

 या मनास लाभेल का,किनारा ।।


 ईश्वराच्या नित्य नामस्मरणात

 मन आनंदी झोपाळ्यावर झुले

 होऊनी चिंतामुक्त जीव हा

 अंतर्मुख होऊनी,अंतरंगात डोले ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy