हे जीवन जगावे कसे
हे जीवन जगावे कसे
--------------------------------------
आज काही कळेना
हे जीवन जगावे *कसे?*
अनामिक भितीत
लोक रहातात का *असे*
मोकळा श्वास घेण्या
आज सारे *आसुसलेले,*
भावना दुखावल्या
जरी होते प्रिय *आपले.*
चार भिंतीच्या आत
आता रोज मरण *आहे,*
निसर्गातील भाव
बरेच काही शिकवू *पाहे,*
एका त्या विषाणूने
सारे जगच *हादरले,*
कोणी नाही कुणाचा
प्रेतास आता भार *झाले.*
निर्धार हा मनाचा
एकत्र येऊनी *करू या,*
हे जीवन जगावे कसे?
जगाला *दाखवू या.*
--------------------------------------
