STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy

3  

Shobha Wagle

Tragedy

स्त्री व्यथा

स्त्री व्यथा

1 min
295

खोटे हसणे मला न जमते सांगते तुला पुन्हा पुन्हा

भाव मनीचे लपवत असते सांगते तुला पुन्हा पुन्हा


दमले आता, खूप ओढला संसाराचा मी गाडा

ताकत नाही, शरीर थकते सांगते तुला पुन्हा पुन्हा


माया ममता उरात नाही, माणूस म्हणू कसे तुला

तुझ्याच साठी रोजच मरते सांगते तुला पुन्हा पुन्हा.


सत्कर्माचा मार्ग धरावा आळशीपणा नको मना

अशीच कामे सदैव करते सांगते तुला पुन्हा पुन्हा


दानी वृत्ती जोपासावी लोकहिताच्या कार्याला

शोभाची तीच वृत्ती असते सांगते तुला पुन्हा पुन्हा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy