वाट त्याची बघते
वाट त्याची बघते
समाजाचा कोणताही विचार न करता त्याच्याशी मैत्री केली
त्याच समाजासाठी तिच्यापासून लांब जाण्यासाठी कारण त्याने सांगितली .
वेड्या तिच्या मनाला सर्व मनातलं सांगायच होतं
पण मैत्री पुढे तिला दुसरं काहीच दिसत नव्हत
त्याच्या विरोधात बोलणाऱ्याना तिने खूप वेळा रोखलं
अबोला त्याचा बघून त्याच लोकांनी तिला खूप वेळा टोकलं
तीला वाटलं होत तो तिच्या प्रत्येक क्षणात असेल
लांब जरी असला तरी तीला आधार असेल
आता एकटीच ती असते आणि स्वतःच्या कामात रमते
कधीतरी येईल तो अशी आशा ठेऊन त्याची वाट बघते
