दिव्य अहिल्यादेवी...
दिव्य अहिल्यादेवी...
प्रगल्भतेचा ज्योतिर्मय अविष्कार
रयतेसाठी अहिल्या तारणहार
सम्राज्ञी ती, प्रजावत्सल शासक
दिव्य धरणीवर अवतार ..........1
पालनकर्ती दीन जनांची
पुरस्कर्ती सती प्रथेची
खचली नाही कधी अहिल्या
खाण अशी ती संस्कारांची........2
आली तिजवर संकटे कितीही
पुरुन उरली ती त्यांनाही
कर्तव्यासि ठरवी लक्ष्य त्या
पती विरहाच्या भयाण जगीही...3
जाज्वल्य तिच्या त्या आचरणांतून
रणरागिणी ती रणांगणातून
विरह,आपदा भ्रम हे क्षुल्लक
सुचवित आम्हा क्षणाक्षणांतून..4
कर्तव्यदक्ष ती,स्थितप्रज्ञ ती
घाव कुठारी साहत होती
सोडून मागे झाले- गेले
पाऊल पुढति टाकत होती....5
होती अद्भुत हिरकणी
ल्याली तुफानच राणी
जगती पुन्हा होणे नाही
वीर धुरंधर अशी वाघिणी...6
