STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract

3  

Rohit Khamkar

Abstract

दिवसे हरवली

दिवसे हरवली

1 min
185

वर्षाचा शेवट आणी तू, दोघेही जवळ की लांब.

कळतंय न कळतंय, जाणून घ्यायची झाली बोंब.


बघता बघता शेवट आला, काही अस कळलंच नाही.

सरते शेवटी नवी सुरवात, अलगद अशी येऊ पाही.


काहीही म्हण या वर्षी, खुप दाखवलय आम्हा.

विसरणार नाही कधीही, एक एक दिवस असा तुम्हा.


चांगल वाईट कधीच बोलणार नाही, शेवटी जगवलस तू आम्हांला.

झाल्या अघटीत अश्या काही गोष्टी, केलं अजरामर तुम्हांला.


आहे तसच राहणार रूप तूझ, फक्त काय ते पाने बदलतील .

प्रयत्नांचा हर एक रूपाने, तेच दिवस पुन्हा बदलतील.


थोडसं लांब जातोय आपन, पण साक्ष कायम असेल.

आठवण इतिहास करेल तुझी, नेमका तेंव्हा मी नसेल.


रुसवा नाही तूझ्यावर की आभार नाही, आपली भेट नियतीने ठरवली.

आयुष्य माझ साक्ष ठरेल, जिथं मोजकी काही दिवसे हरवली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract