दिवस माझे सुखाचे
दिवस माझे सुखाचे
सध्याचे दिवस कष्टाचे
प्रचंड ताण तणावाचे
कुठे गायब झाले
दिवस माझे सुखाचे||१||
ते दिवस बालपणीचे
मित्रांबरोबर खेळण्याचे
गमती जमती करण्याचे
दिवस माझे सुखाचे||२||
ते दिवस एकजुटीचे
प्रेमळ, निखळ संवादाचे
सुखदुःखात साथ देण्याचे
दिवस माझे सुखाचे||३||
देवापाशी काय मागायचे
बंध जुळून येवोत मैत्रीचे
परत मिळू देत मज
दिवस माझे सुखाचे||४||
