STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

दिवाळी--कवी

दिवाळी--कवी

1 min
895



आली दिवाळी,दिवाळी

संगे आनंद आणला

दारी पणत्या पेटल्या

आकाश कंदील लखलखला


लुटा आनंद सणाचा

विघ्न नको फटाक्यांचे

गोड फराळ करावा

तेज लाभावे रोषणाईचे


सण साधासुधा असावा

नको पैस्यांची उधळण

क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी

नको आयुष्याची चणचण


सुख समाधानात मानावे

नको हाव जगण्याला

सहवास नात्यांचा लाभावा

लोभ नको रे मनाला


नको फटाक्यांचा कचरा

नको कर्ण कर्कश आवाज

अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा

युवकांनी पार पाडावा रीतिरिवाज


नको ध्वनी प्रदूषण

हटवा वायू प्रदूषण

द्या संदेश शाळेतून

राखा शुद्ध पर्यावरण


व्हावा संस्कृतीचा विचार

जतन करावा वारंवार

एकतेचे व्हावे दर्शन

मनी बाळगावा थोर विचार


व्हावे सण सर्वांचे

मानवधर्म पाळावा

विश्व भावना रुजावी

संदेश शांतीचा असावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational