Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubhangi Joshi

Tragedy

3  

Shubhangi Joshi

Tragedy

दिवाळी आली पण वेळ नाही

दिवाळी आली पण वेळ नाही

1 min
202


हल्ली आमच्या लहानपणीची 

दिवाळी होतच नाही...

कारण आता दिवाळीला वेळच

मिळत नाही....


आई छान छान फराळ बनवणार

आम्ही मात्र फक्त चवच घेणार


सुट्टीत दुपारी मोठ्यांची झोप मोडणार

आणि रात्री मात्र ...

बाबांचा बोट धरून फटाके उडवणार


दिवसभर मित्र, मैत्रिणी यांच्यातच रमणार

मामाच्या गावाची मात्र आतुरतेने वाट

पाहणार....


आता मात्र हे सर्व हरवलंय....

कुठेतरी दूर निघून गेलय ....


 फराळासाठी आईला कुठे वेळ

बाजारात असते की सर्वी भेळ...

विकत आणून खाऊया

बसून मज्जा घेऊया


मोठ्यांचीच आता सुट्टी खरी...

छोट्यांच्या हातात मोबाईल भारीत भारी..


वेळच नाही हो फटाके फोडायला

नाहीतर आहेच की प्रदूषणाचा कल्ला...


मामाच्या गावाची हौसच न्यारी

वर्षातून एकदाच भेटते स्वारी


साता समुद्रापार तो राही

आईला माहेरपण फक्त बाबा आणि आई...


ना मामा ना मावशी ,

काका, काकी तर दूरच राहिले

हिशोबाच्या या गुंत्यात मात्र

नाते सारेच ओस पडले...


कसले सण आणि कसले काय

हल्ली फक्त चाललेत पाय...


थांब म्हणायला कुणाला सवड

ज्याने त्याने निवडली आहे स्वतः ची आवड...


हे असेच जर सुरू राहिले

तर...

सांगा मग पुढच्या पिढीचे काय चुकले....?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy