STORYMIRROR

Shubhangi Pathak - Joshi

Tragedy

3  

Shubhangi Pathak - Joshi

Tragedy

ती कुठे चुकते

ती कुठे चुकते

1 min
139

ती ही त्याचं आईच्या

उदरात जन्म घेते...

साऱ्या मान मर्यादा सांभाळते

मग सांगा आता मला की

ती कुठे चुकते....?

शाळा, कॉलेज करताना

वाईट नजरांना सामोरी जाते

आईचे संस्कार उराशी बाळगते

मग सांगा आता मला की

ती कुठे चुकते....

स्वतः चे स्वप्न बाजूला ठेवून

मुलांना नवीन वाटा दाखवते

स्वतः चे अस्तित्व विसरून

दुसऱ्याचे मन राखते

मग सांगा आता मला की

ती कुठे चुकते....

आई, बहीण, बायको, वहिनी

साऱ्या भूमिका यशस्वी पने पेलते

स्वतः चा मी पना हरवून बसते

तरीही सांगा मला आता

ती कुठे चुकते ....?

नोकरी करून त्याच उमेदीने

घराचाही सांभाळ करते....

प्रत्येकाची आवड , निवड जपते

तरीही ती कुठे चुकते .... ?

साऱ्यांना ताजं देऊन

खरवड स्वतः च्या ताटात घेते...

नवरा, मुलांपासून शिळे लपवते

तरीही ती कुठे चुकते...?

एक दिवस निजून राहण्याचा हक्क

आहे तिलाही

पण तो हक्क ही ती बजावत नाही

सांगा मला आता तरीही

ती खरच कुठे चुकते....

खरच ती कुठे चुकते....?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy