आत्मविश्वास
आत्मविश्वास
तो काल अचानक भेटला
विसरलीस ना मला, विश्वासाने म्हणाला...
हो विसरली , कारण आता जबाबदारी आली
कुणाची तरी सौ . झाली...
रोजच्या धावपळीत कसे जगायचे
हे शिकले...
पण स्वतः साठी नाही ह,
दुसऱ्यांसाठी जगले....
सासू , सासरे, नवरा यांचा
नेहमीच असतो आदर
त्यांच्यातच दिवस जातो निघून
खोचून साडीचा पदर...
मुलं पण आता मोठी झालीत
आई ला थोडी परकी झालीत
मी पण म्हणते आता
थोडं बिझी व्हावं
मतलबी या दुनियेत
थोडंसं स्वार्थी व्हावं...
तो म्हणाला...
इतकी गरज असताना देखील
हाक नाही मारलीस
अग बघ जरा स्वतः कडे
किती पायऱ्या खाली उतरलीस...
ते काही नाही आता दे हातात हात
ये माझ्या सोबत डोकव जरा आत
जो तुझ्यात आधीच होता
तुझीच तर वाट पाहत होता
उचल एक पाऊल
अन् घे भरारी उंचाने
हात दिलाय तुला आता
तुझ्याच आत्मविश्वासाने...
