बाप हा बापच असतो
बाप हा बापच असतो
*बाप हा बापच असतो....*
आईची थोरवी
बापाचे गुणगान,
गावे कितीही
होई ना समाधान....
आईची माया
दिसे जगी,
अहो .... बापही काही
कमी नाही.....
लेकराला ताजे देऊन
जरी आई शिळे खाई,
त्या अन्नाची शिदोरी
मात्र, बिचारा बापच पाही....
शिक्षणासाठी मुलांच्या
झिजल्या हो त्याच्या चपला,
संसारासाठी मुलीच्या
जीव ओवाळून टाकला....
ना ठेवता अपेक्षा
ना कसली हौस,
परिस्थिती नसतानाही
पाडला पैश्याचा पाऊस...
देवकी यशोदेच प्रेम
मनात साठवा,
टोपलीतून बाळास नेणारा
वासुदेव ही एकदा आठवा...
आईकडे असतील जरी
अश्रूंची वाट,
तर बाप म्हणजे
संयमाचा घाट....
जीवनभर मुलांच्या पाठी
बापाच्या सदिच्छा,
त्यांनी समजून घ्यावं
हीच माफक ईच्छा.....
आ. तीर्थरूप आणि प्रेमळ अश्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनस्वी नमस्कार....
