कष्ट आणि नियती
कष्ट आणि नियती
ध्येयाच्या वाटेवर चालताना
यशाची पायरी समोरच होती
मार्गात काटे होतेच
पण वाट वळणाची होती,
काट्या काट्यातून जाणारी वाट
वेदना देत होती...
ध्येय मात्र निश्चित आहे
मनाला समजूत मिळत होती...
झुंज देणे रक्तातच भिनलेले
इथे नशीबाची साथ नव्हती
काबाड कष्ट, आणि मेहनत
ह्यांच्याशी नियती ची मैत्री होती....
मैत्री अखेर घट्ट झाली
ध्येयाचा कोपरा दिसू लागला
चढण्याची आस होती
पण किंमत लाख मोलाची होती.,.
अखेर शेवटची पायरी चढले
आणि नियतीने अलगद खेचले
मार्गातील काटे दूरवर राहिले
यशाला हात पोहचले. ..
सर्व प्रवास लक्षात आला
इथे किंमत नसे धुर्तला
जर प्रामाणिकता उरी बाळगला
नियती ही साथ देईल कष्टाला...
