मी न राहिले माझी
मी न राहिले माझी
मी माझी न राहिले
जेव्हा तुला... मी पाहिले (2)
त्या सुंदर क्षणांनी
अंग अंग मोहरूनी
कितीदा नव्याने
दर्पने न्याहाळले
मी माझी न राहिले.......
वाटे तुझा भास...
सदोदित आसपास
भान येताच
गाली हसले...
मी माझी न राहिले....
अश्या धुंद कातरवेळी
पाठी सावली कोवळी
लगबग तुझी चाहूल
जवळूनी पारखिले
मी माझी न राहिले....
