पाऊल
पाऊल
1 min
229
अचानक चालताना आज
पावले अडखळली
वाट आहे वेगळी म्हणत
स्वतः च मागे फिरली.....
ध्येयाच्या वाटेवर चालताना
मार्गातील काटे दाखवीत होती
चालणे जरी कठीण झाले
गणित मात्र समजावत होती....
मागे वळून पाहताना
मलाच लज्जा आली
आजवर आपण काय केले
याची सर कधीच सरली....
