बालपण माझे
बालपण माझे
आजी म्हणते
अभ्यास कर रे बाळा
शिक्षण हेच आपले भांडवल आहे
बाबांकडे बघ एकदा
त्याच्याच पावलावर पाऊल आहे...😁
आजोबा म्हणतात
खेळू नकोस जास्त वेळ
थोडा बाकी राहू दे
विज्ञानाच्या या युगात
मेंदू तुझा शाबूत राहू दे....😣
आई म्हणते मेल्या
अभ्यास कर थोडा
सतत आपले खेळणे
कधी होशील मोठा घोडा😉
बाबा तर वेगळीच
धमकी देतात...
शब्द नाहीत म्हणून
हात चालवतात... 🤬
सांगा मला आता मी
कसे काय करू😞
माझे बालपण पुन्हा येईल का
हे सर्वांना कसे समजावू....😒
खेळू द्या हो मला
मी तर अजून लहानच आहे
सतत अभ्यासाचे रडगाणे
हे तर आयुष्यभराचे दुखणे आहे...🤩
अहो मोठा झालो की
तुम्हालाच माझी आठवण येईल
आणि मग सर्वच म्हणतील
मेल्या तू लहानच बरा होतास
उगाच मोठा झालास.... 😂
सर्व बाळगोपाळाना
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
