माझा कान्हा
माझा कान्हा
माझा कान्हा गेला रुसून
बाई माझा कान्हा गेला रुसून
कुणी आना ना त्याला शोधून
माझा कान्हा.....
गोप गोपी गोळा करून
खेळीतसे लपून छपून
उगा खोड्या काढी कुठून
कुणी आना ना त्याला शोधून
माझा कान्हा....
दही, दूध, लोणी चोरून चोरून
खाऊ घाली भरून भरून
पहिले मी त्याला डोळे पुसून
माझा कान्हा गेला रुसून
बाई माझा कान्हा गेला रुसून
कुणी आना त्याला शोधून
पाहीन मी डोळे भरून
माझा कान्हा गेला रुसून
बाई माझा...
