STORYMIRROR

Tejashree Deshpande

Abstract Drama

3  

Tejashree Deshpande

Abstract Drama

दिन

दिन

1 min
179

दिन वावरणारे फसवे, दिन पाझरणारे फसवे...

दिन शांत स्तब्ध नाही रे, दिन आर्त आकांत कसले...


दिन खोटा उजेड माथी, झाडांची हिरमुस पाती...

दिन लपवून काळोखाला, दुःखाची आत समाधी...


दिन उगाच इतुका हासे, दिन निष्ठुर कसला भासे...

दिन शांत स्तब्ध नाही रे, दिन कसले देई दिलासे...


ह्या असल्या कोरड बाता, ही असली चिंता जाळी...

मी रोखू शके ना वेडी, रोजचीच तिमिर भूपाळी...


दिन रात्री आठवताना, मज कोरून काढत सजवे...

दिन शांत स्तब्ध नाही रे, दिन आर्त आकांत फसवे...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract