पंचप्राण
पंचप्राण
गंधाक्ष गंध तो, कसा फुले तव अंकी |
वाऱ्याची अल्लड, तार कोवळी हलकी ||
तव गंधावाचून, जाय कसा मोगरा |
दवबिंदू सांडूनी, उडे बघा लाजरा ||
ती हळूच चालली, कालिंदीवर जणू की |
मन कसे आवरू, त्यात तू मधुपंखी ||
जा उठोनिया जा, धाडीयले भरवेळी |
पण कशी आवरू, छंदिस्त मन पाकोळी ||
हे गगन मोकळे, गायिल ही गुणगान |
तव पदरी सांडला, बघ हा पंचप्राण ||

