STORYMIRROR

Tejashree Deshpande

Romance Inspirational

3  

Tejashree Deshpande

Romance Inspirational

मावळती✨

मावळती✨

1 min
115

मावळतीच्या दोन पायऱ्या, एक गुलाबी एक शराबी |

मावळतीची एक आठवण, आणि एकली शीळ दिवाणी ||


जसा उंबरा गाली हसता, पाऊल होई लेक लाडकी |

परतून माघारी जाताना, का अडखळे अशी सारखी ||


कसे व्हायचे कुठे जायचे, मनी ठरवूनि काय होते |

हसतो रडतो जेव्हा केव्हा, हाय होउनि साय होते ||


मावळतीची दोन घरे ती, अल्याड काचा पल्याड काचा ||

रे पक्ष्यांनो मावळतीला, खुशाल सांगा निरोप माझा ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance