STORYMIRROR

Tejashree Deshpande

Abstract Drama Inspirational

3  

Tejashree Deshpande

Abstract Drama Inspirational

घर

घर

1 min
155

बांधायाला घेतलं घर, 

काळ सुमार गळणारं |

रात जागून छतामधून,

पाउस बघत बसणारं ||


बांधायाला घेतलं घर,

पत्त्यांवरती रचले पत्ते |

घरामधलं पाणी काढलं,

डोळ्यांमधलं पाणी काढलं ||


बांधायाला घेतलं घर,

छत होतं गळणारं |

पाउस होता आत बाहेर,

दुःख होतं रमणारं ||


रमणाऱ्या दुःखानेही,

पुसले डोळे पुसले पाणी |

ओल्या कागदावरचे शब्दच,

ऐकू सांगू लागले कहाणी ||


बांधायाला घेतलं घर,

पाउस दिसला पाउस हसला |

पाण्याखाली एक एक,

पत्ता पडला पत्ता फसला ||


बांधायाला घेतलं घर,

ओल्यातच निजली राणी |

ओल्या कागदावरचे शब्दच,

ऐकू सांगू लागले कहाणी ||


बांधायाला घेतलं घर,

घर झालं, बंगला झाला |

पाउस आला भेटायाला,

पत्ता सुध्दा खुलून हसला ||


बांधायाला घेतलं घर,

घर आहे कागद आहे |

ओला सुका दोन्ही आहे,

राणीसुध्दा खुशाल आहे || 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract