STORYMIRROR

Tejashree Deshpande

Classics Inspirational

3  

Tejashree Deshpande

Classics Inspirational

जगलो म्हणजे जमलं

जगलो म्हणजे जमलं

1 min
195

जगण्यामधले जगणे शोधून, जगलो म्हणजे जमलं...

पाणावलेले काठ लपवून, हसलो म्हणजे जमलं...


उरात भलते सलते काही, रोज उगवून येते...

त्या भलत्याने हळूच आतून, जळलो म्हणजे जमलं...


येणे जाणे गाठीभेटी, आयुष्यच वाटते...

सोडून जाण्याने कुणाच्या, रडलो म्हणजे जमलं...


या जन्माचे ऋण असे की, जन्म आहे काळभर...

क्षण प्रत्येकी मानून आपला, बसलो म्हणजे जमलं...


पडणे धडणे जखमा ठेचा, भागचि आयुष्याचा...

कोसळल्यावर नव्या उमेदीत, उठलो म्हणजे जमलं...


एकच आहे, पुन्हा नाही, कळले जितके लवकर...

तितक्या आनंदाने रोजच जगलो म्हणजे जमलं...


चला शेवटी मरून जाणे, चुकणे नाही कुणाही...

जगण्यामधले जगणे शोधून, जगलो म्हणजे जमलं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics