STORYMIRROR

Tejashree Deshpande

Classics Inspirational

3  

Tejashree Deshpande

Classics Inspirational

सगळं सगळं कळून जातं

सगळं सगळं कळून जातं

1 min
161

असं तुझं लाजताना, गालातल्या गालात हसताना,

कुणीतरी पाहून जातं, सगळं सगळं कळून जातं


तू अशीच स्वतःमध्ये, रमून रमून जाताना, 

जुनं जुनं गाणं एक, स्वैर गुणगुणताना, 


खिडकीमधून कुणीतरी, हसत तुला बघून जातं, 

कुणीतरी पाहून जातं, सगळं सगळं कळून जातं


मन कसं तुझं नेहमी, उडत असतं सैरावैरा, 

कधी इथे कधी तिथे, विचारांचा नसतो थारा, 


पडद्याआडून कुणी तुझी, कविता, तुलाच ऐकवून जातं, 

कुणीतरी पाहून जातं, सगळं सगळं कळून जातं


गालावरच्या खळीकडे, तुझं कधीच लक्ष नसतं, 

मोकळ्या उडणाऱ्या बटांना, बंधन कसलंच ठाऊक नसतं, 


तुझी कोरी पानंसुध्दा, कुणीतरी वाचून जातं, 

कुणीतरी पाहून जातं, सगळं सगळं कळून जातं


प्रेमात असतेस म्हणे तू, तुझ्या खोलीतल्या कोपऱ्यांच्या, 

मंद वारा, उघडी खिडकी, अनपेक्षित पडणाऱ्या झऱ्यांच्या,


हे असं हरवून जाणं, कुणाला तरी भावून जातं, 

कुणीतरी पाहून जातं, सगळं सगळं कळून जात


भान राखून जगत नाहीस, डोळ्यातलं पाणीही अडवत नाहीस,

आयुष्य कसं सरून जातं, मन कसं भरून जातं,


असंच जगणं, मनमुराद राहणं, काहीतरी शिकवून जातं, 

कुणीतरी पाहून जातं, सगळं सगळं कळून जातं.


खरंच, सगळं सगळं कळून जातं...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics