STORYMIRROR

Tejashree Deshpande

Others

3  

Tejashree Deshpande

Others

घनश्यामा...

घनश्यामा...

1 min
116

जाते करायला बसली माई, ओवी गाते जना | 

दिस संपला आता तरी, परतून ये रे घना || 


गेला गायी चरायला, सवे घेऊनि बलराम | 

यशोदामाय करी आर्जवे, परतून ये रे श्याम || 


मावळला दिस, लागली प्रेमाची तृष्णा | 

म्हणे राधा व्याकूळ होऊनि, परतून ये रे कृष्णा || 


गाई गोडवे तुझेच सारे, सोसून सारी निंदा | 

गाते मीरा रोज तरी, परतून ये रे गोविंदा || 


जन्म दिला जगी जिने, दाखविले रे त्रिभुवन | 

म्हणे देवकी रातंदिन, परतून ये हे जगज्जीवन || 


Rate this content
Log in