STORYMIRROR

Tejashree Deshpande

Drama Romance Classics

3  

Tejashree Deshpande

Drama Romance Classics

गोपी

गोपी

1 min
176

सुंदर गोपी कशा गोकुळी, पहा चालल्या रे...


या सुमनांच्या भवतालातून वसंत जणू दरवळे...

भवबंधाच्या मिलनघटिका, स्मरणचिन्ह हासरे...


मन तृप्तीने रंगून दंगून खुशाल उडते पहा...

कृष्णमेघ तो आनंदाचा आशय देतो नभा...


तृणावर्ती ते हरित दाटले रेशीम संध्येचे...

रंग उधळीले घनश्यामाने खुशाल क्षितिजाचे...


कंच तांबडे फुटले, ओव्या, मुखात आल्या रे...

सुंदर गोपी कशा गोकुळी, पहा चालल्या रे...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama