STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

दीपोत्सव

दीपोत्सव

1 min
361

पवित्र असा मोठा सण

प्रेमगंध आणि ऋणानुबंध

करुनी प्रकाशाची उधळण

मनामनात भावनेचा गंध ||


घराच्या अंगणी रांगोळी

लखलखे दिवे द्वारी

नवचैतन्य मिळेल मनी

सुखाची उधळण घरी ||


करुनी धनाची भक्तिमय पूजा

प्रकाशाने घालुयाअभंगस्नान

गोड फराळ, दिव्यांचीआरास

मानाचे करूनी लक्ष्मीपूजन ||


साडेतीन मुहूर्तापैकी असा

वर्षातीन येतो दिवाळी पाडवा

एकात्मतेने आपण सर्व राहू

नात्यातील वाढवूया गोडवा ||


क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

भावा - बहिणीचा हा सण

ओवाळणी बहिणीला देऊनी 

भाऊबीजेला असे फार मान ||


पर्यावरणाशी एकरूप होऊ

नको फटाके, नको प्रदूषण

द्यावा असा संदेश शाळेतून

राखू या शुद्ध हवा ,पर्यावरण ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational