STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

दीप लावू मनोमनी

दीप लावू मनोमनी

1 min
407

मनातली जळमटे

दूर करु धूळ जाळी

टाकू काढून सत्वरी

सज्ज स्वागता दिवाळी   (१)


प्रभू असे कृपावंत

धन धान्य अगणित

देऊ गरजू जनांस

हर्षभारे प्रमुदित    (२)


ज्योत सद्विचारांची

लावू प्रत्येक अंतरी

तेजोमय प्रकाशाने

उजळेल धरा सारी    (३)


नववस्त्र दान करु

प्रेमे फराळही देऊ

मन विशाल करुनी

दीपोत्सव उजळवू     (४)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract