ध्येय देती पंख
ध्येय देती पंख
क्षितिजास का प्रश्न पडावा
भास उगा का मनी छलावा
वाऱ्यावरी का झुलवे वादळा
जगी उगाच का भान हरावा
अशक्यप्राय नसते न काहीच
इच्छेस प्रयत्नांची साथ हवीच
प्रकाशित भास्कर नाही उगाच
सातत्याची सवय अंगी हवीच
क्षणास हरला भाव न जगला
आभास जगीचा कयास घडला
जगात उरतेच काय ते शेवटाला
प्रवास तरी थांबवावा कशाला
कठिण तसही काहीच नसत
इच्छेला पंख ध्येय देत असत
थकल्या मनाला आशा स्वप्नात
जगायला अर्थ स्वप्नाच्या श्वासात
सार्थकी जग हे गुंतल्या धाग्यात
ढळू नकोस कधी ही ध्येय्यास
केवळ एका क्षणाच्या या भयास
बळी देवू नको कधी ही स्वप्नास।
✍©️®️सारिका कि ऐवले
@sari