सुंदर हास्य
सुंदर हास्य
किती सुंदर हास्य तुझे
गालावरची खळी ही लाजते
कोरीव तुझे ओठ त्यात
माझ्या डोळ्यात तुझी नशा ही चढते
तुझ्या गोड हसण्यात दाटलेले प्रेम आहे
रंगबिरंगी रंगात गुलाबी उधळून रंग हा तुझ्या
त्या गुलाबी ओठांवर खुलून दिसतो आहे
तुझ्या सुंदर हसण्यात
चंद्र ही लाजतो आहे

