शेवटची आठवण
शेवटची आठवण


शेवटची आठवण रुजली थेट काळजात
प्रेम त्याने केले जिवाचा आरपार
रुजले शेवटी बोल त्याचे माझा काळजात
प्रेमात पडले होते फुलराणी त्याची होऊन
भटकत होते मी फुलपाखरू होऊन
त्याने साथ दिली मला उडते पाखरु होउन
मग उंच भरारी घेऊन फिरत होते त्याची राणी होऊन
जगलो असतो आम्ही स्वपण आमचे रंगहुन
रंग निरनिराळे लाल रंग उधळून
त्याच्या आठवणी आता माझा
हृदयात साठवून आहे
नात्यातील मधुर वाणी
अजुन जपून आहे
शेवटची आठवण अजुन आमचे प्रेम आहे
नात्यातील भावनांच्या गुंत्यात गुंतुन आहे