प्रेमाचा पाऊस
प्रेमाचा पाऊस


पहिल्या पहिल्या पावसात
शिवार दरवळतं नव्या सुगंधात....
हिरवंगार एक स्वप्न भरारी घेतं....
धरतीच्या मनात....
कोसळतोय तो पाऊस,
हलक्या सरींनी
सोनेरी त्या उन्हात....
रिमझिम पाऊस तुझ्या प्रेमाचा,
अोथंबून वाहतोय....
अगदी तसाच माझ्या मनात....
उधळोनी बंध सारे,
घे हातात हात....
भिजू दे मजलाही,
चिंब त्या प्रेम - पावसात....
ती चिंब तो ही चिंब
दोघांच्या नजरेत प्रेम प्रतिबिंब
ओला थेंब , ओली सर....
प्रितीची रात्र , मिठीतला बहर....
ढगांचे बाण , विजेचे तीर....
ओठांवर ओठ आणि श्वासही अधीर....
मनाचा सांगावा , शब्दात बांधावा....
प्रेमाचा पाऊस कधी ना थांबावा....
तुझ्यासोबत भिजताना,
प्रेमाचा उधाण पाऊस,
मनातही दाटत असतो....
तू सोबत नसताना
आठवणींच्या रुपात तोच पाऊस
मला पुन्हा पुन्हा भेटत असतो....