अबोल प्रेम बहरावे
अबोल प्रेम बहरावे
अबोल प्रेमही बहरावे असे
कळीने नकळत उमलावे जसे
तृणपाते हवेत लहरावे जसे
थांबल्या जळी तरंग उठावे जसे
अल्लड परीने सावरावे जसे
लाजून सखीने बावरावे जसे
पानावर शब्द कवीचे उमटावे जसे
क्षीतीजाने अवनीला भेटावे जसे
गुलमोहराने रान लाल पेटावे जसे
ओल्या पापणीने अलगद मिटावे जसे
तुझ्या माझ्यातले अंतर मिटावे जसे..
अबोल प्रेमही आज बहरावे असे.

