तुझा रूसवा
तुझा रूसवा
तुझा रूसवा नाही कळला
घडला असा मोठा गुन्हा
माझी तू सखी प्रिया
घडणार नाही असे पुन्हा
तुला पाहता सामोरे
पाहणे घडते फक्त
घेइन कवेत म्हणतो
नजरेने बोलने घडते फक्त
कधी वाटते बोलावे
गर्दीत असतेस हरवलेली
शोधावा म्हणतो एकांत
असतेस सभा तू भरवलेली
माझ्या प्रत्येक शब्दातली
तळमळ लक्षात घे तू
जोडलोय दोघे आपण
एक जीव एक प्राण तू
मनातला वास तूझा
डोळ्यात दिसतो स्पष्ट
समोर असताना ही तू
बोलण्यास पडती कष्ट
जावे म्हणतो तुझ्या सवे
दूर प्रेमाच्या गावात
नसावे तुझ्या शिवाय कोणी
जगूया चार क्षण आनंदात