STORYMIRROR

PRASHIS SHIRSAT

Romance

3  

PRASHIS SHIRSAT

Romance

क्षण आला हा सुखाचा

क्षण आला हा सुखाचा

1 min
11.9K

हिरवा हिरवा दाट निसर्ग आवाज देती 

थेंब या पावसाचे तुला लपुनी पाहती

मोराचा हा पिसारा , कसा फुलतो जरी

पाहता क्षणी रंग हा सुखाचा

पाऊस प्रेमाचा , गंध मातीचा 

क्षण आला हा सुखाचा ।।


नभातुनी आला हा थंडगार गारवा

तुझ्यामाझ्या भेटीचा वेगळा गोडवा

तुझ्या गालावरती हास्याची वेगळी दशा 

तुझ्यात भुलवेल मला तुझीच दिशा 

ओल्या मौसमात माझ्या ह्रदयी तुझीच ज्योती

पाखरु , फुलांना तुझे रुप हे सांगु किती

मुखातुन निघती तुझ्यासाठी शब्द सुखाचा

पाऊस प्रेमाचा , गंध मातीचा

क्षण आला हा सुखाचा ।।


या निळ्या आभाळात रंगुनी गेले सप्तरंग

चाहुल लागली तुझीच मी तुझ्यातच दंग

जोऱ्यात आली कुठून ही वादळी हवा

कसा उडतोय बघ पाखरांचा थवा 

उभा हाय तुझ्यासाठी हास्य गालावर ठेवुनी

दे आयुष्यभर साथ जाऊ नको सोडुनी

घेतो मी आता श्वास सुखाचा

पाऊस प्रेमाचा , गंध मातीचा

क्षण आला हा सुखाचा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance