तुझा शृंगार
तुझा शृंगार


आभुषणाविन तुझा
शृंगार खास होता
मी नव्हतो आरसा
माझाच भास होता.
करताना शृंगार तू
आरसा मी गं व्हावे
प्रतिबिंब ते रुपेरी
ह्रदयात या रुतावे.
बटा तुझ्या रुळता
भाळावरुन खाली
निमिषात पापणीची
किती उलघाल झाली.
रोज करावा असा
तू शृंगार आरस्पानी
या रंकाची खरीच
शोभतेस तू रमणी.