तुला जाणवे का?
तुला जाणवे का?
तुझ्या सोबतीने...
आता श्वास येतो...
धरुनी तुला तो...
विसावा ही घेतो...
असे गुंतणे हे
जिवाचे तुझ्यात...
तुला जाणवे का?
मला प्रश्न आता!!
तुला रोखुनी
पाहता आज वाटे...
किती पावसाळे...
फक्त आले नी गेले...
तुझे सौख्य- सानिध्य
खुलवीत गेले...
ऋतु तृप्ततेचा...
नी सौभाग्य माझे!!!
तुझा हात
हातात आला
नी कळले...
नवे अर्थ- संदर्भ
आपुल्या जगाचे...
असे खोल रुजणे
जिवाचे सुखात!!...
तुला जाणवे का?
मला प्रश्न आता!!..