आठवणी
आठवणी


मी पाहिलीत कित्येक स्वप्ने तुला भेटण्याची
गर्दीत आठवणींच्या गुंग झालो मी
तू टाळलीत पत्रे माझ्या प्रेमाची
लिहिणे आता हल्ली सोडले मी
स्पर्श तुझ्या आठवणीचा साठला मनी
खोली माझ्या मनाची वाढवली मी
वर्णन काय करू तुझ्या रूपाचे
शब्दच बोलण्याचे आता विसरलो मी
तू दिसता क्षणी पसार अशी होतेस
जग पाहण्याची दृष्टी सोडली आता मी
नको आठवू शब्द माझ्या बोलण्याचे
तुला आठवायचे विसरलो आता मी