STORYMIRROR

Padmakar Bhave

Abstract

3  

Padmakar Bhave

Abstract

ध्यानी ठेव

ध्यानी ठेव

1 min
268

आकाश पेलतांना,

लागते धाप तिलाही,

चांदण्यांनी मोहोरबंद असतात तिचे ओठ, पुराणकाळापासून!

संस्कृतीची गोणपाटं वाहून

उमटलेल्या वळांवरती ठेवलंय गोंदून दिसू नयेत वळ म्हणून!

मेंदीच्या रंगाच्या खाली तळहाताच्या रेषांनाही केलंय चिरेबंद....,

तू हमाल होऊन वहायची जमिनीची सहनशीलता,

व्योमाची विशालता,

मृत्तिकेचं दातृत्व!

तू भरडून घ्यायचं निमूट गिधाडांच्या चोची पंखात !

फाटलेल्या ओठांतून गाणं गात रहा....

फेर धरून नाचत रहा...

त्यासाठी पैंजण घाल.

आमच्याकडे मंदिर आहे पिढीजात पुरातन संस्कृतीचं!

त्यातली तू ज्योत हो...

समई हो....

धूप हो...

मंद तेवणारी अगरबत्ती हो...

तू या मंदिराचा पाया आहेस.

कळसाचा भार आहे तुझ्यावर

"कळस झाला तरीही."

बोलू नकोस, ओरडू नकोस

मंदिर भंग पावेल,

सारं काही तुझ्यावर आहे--बाई!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract